नांदुरा : येथील किराणा दुकानाचे टिनपत्राचे नट काढून दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकिस आली आहे. मिळालेल्या माहितिनुसार येथील सिंधी कॉलनी येथील रहिवासी सुरेश पमणदास अहुजा यांच्या किराणा दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी तीन पत्राचे नट कडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील काजू , बदाम,किसमीस व नगदी ३ हजार रुपये असा एकूण १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ११ फेब्रुवारी रात्री १० ते १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सुरेश पमणदास अहुजा ५५ यांनी नांदुरा शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम ३८०,४६१ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार कस्तुरे करीत आहे. चोरीच्या वाढत्या घटनामुळे नांदुरा वासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील परिसरात पोलिसांची रात्रीच्या वेळी गस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.