November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी व्यापारी

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ३० क्विंटल तांदूळ पकडला चार लाखांचा मुद्देमाल जप्तः दोघांविरोधात गुन्हा दाखल

खामगाव: शहर आणि परिसरात रेशन तांदुळाचा काळाबाजार गत काही दिवसांपासून वाढत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री साडे आठ वाजता दरम्यान लाभार्थ्याकडून खरेदी केलेला तांदूळ एका वाहनातून नेत असतांना पोलीसांनी पकडला. या कारवाईमध्ये तीन लक्ष रुपये किंमतीच्या वाहनासह ४२ हजार रुपयांचा रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी कारचालकासह एकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव तालुक्यातील रेशन माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खामगाव आणि परिसरात गत काही दिवसांपासून रेशन तांदुळाचा काळाबाजार वाढीस लागला आहे. बुधवारी रात्री शहर पोलिसांनी स्थानिक विकमशी चौकातून ३० क्विंटल रेशनचा तांदूळ असलेले एमएच १९ एस ७४९७ क्रमांकाचे मालवाहू वाहन पकडले. यावेळी आरोपीचा तीन हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी पथकातील पो.ना. सुधाकर थोरात यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठल शांताराम व्यवहारे (१९, रा. वाडी) आणि विजय लक्ष्मण काळबांडे (५४, रा. चांदमारी) यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Related posts

शेतातील गोडाऊन मधुन 2 लाखाचे सोयाबीन लंपास,टेंभुर्णा शिवारातील घटना

nirbhid swarajya

अनलाॅक 5 मध्ये राज्या अंतर्गत व राज्या बाहेरील काही रेल्वे सुरू करण्यास परवानगी

nirbhid swarajya

रक्तदानाचे करा अभियान रक्तदानाने कित्येकांचे वाचतील प्राण

nirbhid swarajya
error: Content is protected !!