खामगाव : बुलढाणा रोडवरील पोरज फाट्याजवळ आज संध्याकाळी ६:०० वाजेच्या दरम्यान काळ्याबाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव मधून बुलढाणा कडे जाणाऱ्या छोटा हत्ती क्रमांक एम एच-२८-ए व्ही-१६५० मालवाहू गाडीतून २० क्विंटल रेशन तांदूळ जात असल्याची गुप्त माहिती तहसील विभागातील कोतवाल सचिन ठाकरे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे आज तहसील पथक व अन्न पुरवठा गोडाऊनचे व्यवस्थापक अमोल बाहेकर यांनी शिरसगाव देशमुख येथून गाडीचा पाठलाग करत पोरज फाट्याजवळ गाडी पकडली. यावेळी गाडीच्या ड्रायव्हरला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावीची भाषा केली. तहसील पथकाने त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २० क्विंटल तांदूळ अंदाजे ४० पोते व वजन काटा असे वाहतुक करताना आढळले. रेशनच्या तांदळाची खरेदी विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे यावरून समोर येत आहे रेशन लाभार्थ्यांना मोफत मिळालेल्या तांदुळाची भंगार व्यावसायिक आणि भुसार मालाचे व्यापारी हे खरेदी करत आहेत व त्यानंतर या तांदळाची काळ्याबाजारात विक्री होत आहे.खामगाव तालुक्यात आत्तापर्यंत गोंधनापूर,सुटाळा,किन्ही महादेव,आणि माथणी येथे अशा अनेक घटना उघडकीस आले आहे.तहसील पथकाने तात्काळ ते वाहन ग्रामीण पोलीस स्टेशनला आणून जमा केले आहे.बातमी लिहीपर्यंत पुरवठा विभागाची कारवाई सुरू होती.
next post