खामगांव : शेगांव-खामगांव रोड वर काल रात्री 12 च्या सुमारास कार व दुचाकिचा अपघात होऊन 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना कांचन ढाब्या जवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खामगांव-शेगांव मार्गावरील लासुरा फाट्याजवळील कांचन हॉटेल समोर दुचाकी व कारच्या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले तर, कारमधील 3 जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्रथम खामगांव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करुन अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. सुमीत प्रल्हाद येवतकर (वय 22), सागर भारतसिंग चव्हाण (वय 25), व मो. दानिश मो. अफसर (वय 18) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.तर कारमधील डॉ. राजेश अवताड़े (वय 45) नारायण मनोहर राऊत (वय 40) सुनील जगदेव बोचरे (वय 51) हे किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकीस्वार सागर भारतसिंग चव्हाण याचा पाय गुडघ्या पासून पुर्णपणे तुटला असून त्याच्या मित्राच्या पायाला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे.काल रात्री 12 वाजेच्या सुमारास दुचाकीवरील तिघे शेगांव वरुण खामगांव कडे येत होते, तर कार मधील पशु वैद्यकीय डॉ. राजेश अवताड़े हे आपल्या सहकाऱ्यासोबत शेगांव कडे जात होते.कांचन हॉटेल जवळ रस्त्याचे काम सुरु असल्याने भरधाव वेगात येत असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील चारही जण रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने जखमी झाले.ही धडक इतकी जोरदार होती कि, दुचाकीचे इंजिनचे तुकडे तुकडे झाले होते,तर कार सुद्धा पलटी खाऊन रस्त्याच्या खाली जाऊन पडली. या अपघाताची माहिती मिळताच खामगांव शहर पो स्टे चे पोहेका गजानन जोशी व शेगांव ग्रामीण चे ठाणेदार सुर्यवंशी घटनास्थळी दाखल होऊन जखमीना तात्काळ खामगांव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. पुढील तपास शेगांव ग्रामीण चे
ठाणेदार सुर्यवंशी हे करत आहे.