जलंब: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद हा उत्सव गुण्या गोविंदाने शांततेत साजरा करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी असे प्रतिपादन जलंब पो.स्टे ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये बोलताना केले.स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमजान ईद शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शांतता समितीचे सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुढे बोलताना म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद आदी उत्सव पारंपारिक पद्धतीने शांततेत पार पाडावे तसेच गावामध्ये जातीय सलोखा व शांतता कायम ठेवून सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आदी उत्सव शांततेत साजरा करावा असे मार्गदर्शन करताना सांगितले. तसेच मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिऊ नये तसेच आपल्या जीवाला कोणताही धोका पोहोचवेल असे कृत्य करू नये व नेहमीप्रमाणे ठरवून दिलेल्या मार्गानेच मिरवणूक काढावी असे आव्हान करीत कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.यावेळी बैठकीला डॉ. प्रकाश गायकवाड, पोलीस पाटिल सौ. संगीता भारसाकडे, एकनाथ कटोलकर, वैशाली खडसे, रामदास कुटे आदी सह पीएसआय शाम पवार, पोहेका संजय पहुरकर, पोका संदीप गावंडे,पोका गोविंद होनमाने ,पोका राहुल वाघ,पोका रवींद्र गायकवाड,पोका सचिन बावणे यांच्या सह सरपंच, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
previous post
