चोरांनी मोताळ्यात विकलेला माल शेतातून हस्तगत केल्याचे दाखविले !बनावासाठी वाहनही बदलन्याचा पराक्रम
खामगाव:वामन नगर भागातील कापड दुकानातील चोरी प्रकरणी काही तासांतच तपास लावल्याचे सांगून शहर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र आता चोरीच्या मागच्या चोरीची अजब गजब व धक्कादायक अधिकृत वसुलीची बनवाबनवी समोर आली आहे. वामन नगर मधील कापड दुकानातील ४ लाखांचा चोरीचा तपास सीसीटीव्ही च्या मदतीने लावण्यात आला
.याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोघांचा शोध करण्यात येत असल्याचे सांगून पोलीस दादा मोकळे झाले. मात्र नंतर यातील “अंदरकी बात’ हळूहळू ‘बाहेर’ आली.आता खाकीच्या हात ओले करण्याची पुष्टी कोण करणार म्हणा ? मात्र खाकीतील बिभीषणांनी दिलेली खबर बाहेर पडली! आता यात खरे काय खोटे काय,हे ‘सिटी’ लाच माहित! या खबरीलाल ने दिलेल्या माहितीनुसार चोरानी चार लाखांचे कापड मोताळ्यात विकला.मात्र पोलिसांनी तो एका शेतातून हस्तगत केल्याचे दाखविले. यात कुणाचे ओले (ओलेचिंब ) झाले हा संशोधनाचा विषय आहे. ज्याला मिळाले ते खुश अन ज्याला नाही मिळाले त्यांनी… याप्रकरणी आज वरिष्ठांनी तपास अधिकाऱ्याला बोलवण्याची सुद्धा पोलीस विभागात चर्चा आहे. खामगाव शहर पोलिस स्टेशन मधील डीबी पथकाला फास आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे