November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ व्यापारी

कापड चोरी प्रकरणात नुसतीच चौकशी! पोलीस अधीक्षकांनाही कारवाईसाठी मुहूर्त मिळेना !! हात ओले करणाऱ्यांना कुणाचे अभय?

खामगाव:-शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने चोरी प्रकरणातील गुन्हा उघड केला होता.याप्रकरणी निर्भिड स्वराज्य ने बातमी मागची बातमी घेऊन सत्य उघड केले होते.त्यामुळे वरिष्ठांनी दखल घेत याप्रकरणी चौकशी सुरू केली. गुन्ह्यामध्ये केलेल्या तपासात संशयित बाबी आढळल्याने या प्रकरणाची वरिष्ठ पोलिसांकडून चौकशी झाली.मात्र चौकशी होऊन बरेच दिवस झाले.परंतु संबंधितांवर कारवाई होताना दिसत नाही.वामन नगर भागातील कापड दुकानातील चोरी प्रकरणी काही तासांतच तपास लावल्याचे सांगून शहर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती.वरीष्ठ अधिकाऱ्यांनी फोटो सेशन सुद्धा करून घेतले मात्र आता चोरीच्या मागच्या चोरीची अजब गजब व धक्कादायक अधिकृत वसुलीची बनवाबनवी समोर आली आहे.वामन नगर मधील कापड दुकानातील ४ लाखांचा चोरीचा तपास सीसीटीव्ही च्या मदतीने लावण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक ही केली.असून दोघांचा शोध करण्यात येत असल्याचे सांगून पोलीस दादा मोकळे झाले. मात्र नंतर यातील ”अंदरकी बात’ हळूहळू ‘बाहेर’ आली.आता खाकीच्या हात ओले करण्याची पुष्टी कोण करणार म्हणा ? मात्र खाकीतील बिभीषणांनी दिलेली खबर बाहेर पडली होती. वरिष्ठांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात आला तपास झाल्यानंतरही वरिष्ठांकडून कारवाई का होत नाही असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण……
खामगाव शहरातील वामन नगर भागातील कापड दुकानातील चोरी प्रकरणी काही तासांतच तपास लावल्याचे सांगून शहर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र आता चोरीच्या मागच्या चोरीची अजब गजब व धक्कादायक अधिकृत वसुलीची बनवाबनवी समोर आली होती. वामन नगर मधील कापड दुकानातील ४ लाखांचा चोरीचा तपास सीसीटीव्ही च्या मदतीने लावण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती मात्र दोघांचा शोध घेऊन अटक करण्यात येत असल्याचे सांगून पोलीस दादा मोकळे झाले होते.मात्र नंतर यातील अंदरकी बात’ हळूहळू ‘बाहेर’ आली होती.मात्र खाकीतील बिभीषणांनी दिलेली खबर बाहेर पडली! आता यात खरे काय खोटे काय, हे ‘सिटीतील’ तो कोणावरही टाकू शकतो ‘फास” व त्या दोघांवर कोणाचाही नाही “अंकुश”! निर्भिड स्वराज्यच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरानी चार लाखांचे कापड मोताळ्यातील व्यापाऱ्याला विकले.मात्र शहर पोलिस स्टेशन च्या डीबी पथकातील पोलिसांनी तो एका शेतातून हस्तगत केल्याचे दाखविले.यात कुणाचे हात ओले (ओलेचिंब ) झाले हा संशोधनाचा विषय आहे. ज्याला मिळाले ते खुश ,(फास)अन ज्याला नाही मिळाले ते…अन खुश..शेवटी एवढेच…मात्र नव्यानेच रुजू झालेले नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्याकडून संबधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चौकशी सुरू आहे योग्य कारवाई होणार-एसडीपीओ कोळी

सदर प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असून चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार संबंधितावर योग्य ते कारवाई करण्यात येणारे असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली आहे.

Related posts

शेगाव तहसीलची अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर धडक कारवाई

nirbhid swarajya

आदर्श गाव कोंटी ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, प्रशासनाकडून कामाची प्रशंसा

nirbhid swarajya

आजची स्त्री सर्व क्षेत्रात अग्रेसर – ऍड. जयश्रीताई शेळके

nirbhid swarajya
error: Content is protected !!