November 20, 2025
अमरावती खामगाव नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ व्यापारी शेगांव शेतकरी संग्रामपूर

कांद्यावरील निर्यात शुल्क मागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी…

खामगाव : सरकारने कांदा निर्यात ४०टक्के शुल्क आकारून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.तरी सदर शुल्क त्वरीत मागे घेण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात झाली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना २१ ऑगस्ट २०२३ रोजी उपविभागीय महसुल अधिकारी मोच्या मार्फत दिलेल्या निवेदशात नमूद केले आहे की, कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुरीला आला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुसकान झाल्याने शेतकऱ्यांजवळ केवळ १० टक्के कांदा उरला आहे.त्यामुळे बाजारात याला भाव मिळत असताना निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या लाचार करण्यात येत आहे.तरी निर्यात शुल्क तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राज्य कार्यकारणी सदस्य गिरधर देशमुख,आनंद आटोळे,अमोल पाटिल, सोपान खंडारे,मासुम शहा, अनिल पाटील, राजेंद्रप्रसाद गवई,शे एजाज शे इसहाक,निलेश गवळी, सुनील बुधे, श्रीकृष्ण भाकरे यांच्या संह्या आहेत.

Related posts

किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे ! प्रतिमा पायदळी तुडविली;ठाकरे गट आक्रमक

nirbhid swarajya

नानाजी देशमुख कृषिसंजिवनी योजनेत सहाय्यक यांच्याकडून हलगर्जीपणा

nirbhid swarajya

४२ जनावरे घेऊन जाणारे कंटेनर पकडले…

nirbhid swarajya
error: Content is protected !!