तहसिलदारांमार्फत पंतप्रधान मोदींना पाठविले कांदे
खामगांव : शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे.कांद्याला समाधानकारक भाव मिळत असतांना केंद्रातील मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकची वाढ केली आहे. या निर्णयाला महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून केंद्र सरकारने हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घेवुन बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी माजी आ.राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरुध्द आज सकाळी 11 वाजता येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काॅंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पुढे बोलतांना दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, एैन उन्हाळा काळात शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावात विकावा लागला होता. आता कुठेतरी कांद्याचे चांगले उत्पादन होवुन भाव सुध्दा चांगले मिळत होते. त्यातच मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे, शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. कांदा जीवनाश्यक वस्तूमध्ये समाविष्ठ नसल्याने त्यावर सरसकट निर्यातबंदी करणे योग्य नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा काॅंग्रेसच्या वतीने सानंदा यांनी तीव्र शब्दात निषेध करुन कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शेतकऱ्यांचे कर्दनकाळ असलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी काॅंग्रेसच्या वतीने यापुढे अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.
यावेळी काँग्रेस चे कार्यकर्ते व उपस्थित शेतकरी बांधवांनी गळयात कांद्याचे हार घालुन भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व या निर्णयाचा निषेध म्हणून तहसिलदारांमार्फत पंतप्रधान मोदींना भेट म्हणून 5 किलो कांदा पाठविण्यात आला. यावेळी शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ,पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के,मनिश देशमुख,खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे,माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर,पंजाबरावदादा देशमुख यांच्यासह काॅंग्रेसच्या विविध सेल,संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.
चैतन्य पाटील, निलेश देशमुख, एजाज देशमुख, गोविंद वाघ, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृष्ण टिकार,मनोज वानखडे, गजानन सोनोने, गोपाल फंदाट, जनार्दन मोरे, अक्षय राउत, ज्ञानेश्वर काळे,मुरलीधर बहादरे, दिलीपसिंह पवार, अनंता गावंडे, भिकाजी मुयांडे, रोहित राजपुत, सुरेश बगाडे, बिलाल खाॅ पठान,प्रितम माळवंदे, पिंटु जाधव, रमेश कोळसे, बाळु पाटील, मयुर सातव, भाग्येश भगत, श्रीकांत देशमुख, विशाल वानखडे, शेख उस्मान, वैभव गायकवाड, वैभव काळे, स्वप्नील ठाकरे, अंकुश टिकार, नागेश वराडे,संतोष चव्हाण, नवलसिंग बोराडे, माणिकराव देशमुख, भरतसिंग तोमर, मर्दानसिंग तोमर, नितीन तोमर, अनंता सातव, गोपाल हिंगणे, ज्ञानेश्वर शेजोळे,आनंदराव शिंगणे, आकाश जैस्वाल, ताराचंद राठोड, काशिराम डांगे यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.