खामगांव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढत्या मक्षागाईच्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ खामगांव येथील तहसीलदार यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. केंद्रातील भाजपचे मोदी सरकार वाढत्या महागाई कडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत वाढत्या महागाईमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले असून जनसामान्यांचे जीवन जगणे दुरापास्त झाले आहे. वाढत्या मागणीमुळे जनताजनार्दन होरपळून निघत आहे. काँग्रेस पक्ष देशभरात वाढत्या महागाईच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आणि सत्याच्या मार्गाने सत्याग्रह करत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी अमेठी येथे पदयात्रा काढली व वाढत्या मागणीचा केंद्रातील मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी महागाईच्या विरोधात हाती घेतलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक तालुकास्तरावर वाढती महागाई नियंत्रणात आणण्याकरीता केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात लढा उभारला आहे. देशात पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत तीव्र असंतोष असून याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसत आहेत. तसेच घरगुती इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या गॅसच्या किमती ही गगनास जाऊन भिडले आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल चे दर कमी असताना इंधनाचे भाव सुद्धा कमी असायला पाहिजे. महाराष्ट्रात भाव शेजारच्या राज्याच्या तुलनेत वाढले आहे. इंधन व गॅस या दोन्ही बाजू शेतकरी क्षेत्राशी निगडित असून शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असून उलटपक्षी रासायनिक खत बी बियाणे चढ्या दराने उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी महागाईच्या विरोधातहाती घेतलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ या आंदोलनाचा भाग म्हणून खामगाव मतदार संघातील समस्त काँग्रेसजन यांनी आज देशाचे राष्ट्रपती यांच्याकडे तहसीलदारां मार्फत दिलेल्या निवेदनामध्ये वाढत्या महागाई कडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारच्या जाहीर निषेध केला आहे. कांग्रेसच्या वतीने दिलेल्या सदर निवेदनावर खामगांव मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, डॉ. सदानंद धनोकार, सुरजीत कौर सलूजा, नगरसेवक किशोर आप्पा भोसले, शेख फारुख तुषार चंदेल, रोहित राजपूत, चैतन्य पाटील पंजाबराव देशमुख, गणेश ताठे, विनोद मिरगे यांच्यासह आदींच्या सह्या आहेत.
previous post