November 20, 2025
बातम्या बुलडाणा

कर्तव्यदक्ष पोलिस दादांना घरपोच मोफत भाजीपाला!


संग्रामपुर : सध्या कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे जनतेने फक्त आणि फक्त घरातच राहावे असे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केलेले असले तरी अनेकांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. अनेक लोक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस   आपली कसब पनाला लावत आहे.अशातच त्यांच्या परिवाराची काळजी म्हणून संग्रामपुर येथील प्रयोगशील शेतकरी विजय रामदासजी वानखड़े यांनी अशा कर्त्यव्यावरील पोलिसदादांना मदतिचा हात म्हणून आठवड्यातुन एक दिवस किंवा आवश्यक असेल त्या दिवशी मोफत घरपोच भाजीपाला देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

आता पर्यंत त्यांनी कर्तव्यावरिल जवळपास २० पोलिसांना घरपोच भाजीपाला दिला आहे. पोलिस स्टेशनला जाउन तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना भाजीपाला पॅक करुण नेऊन दिला आहे. या वेळी कर्तव्यावर असलेल्या श्री. साठे व इतर कर्मचाऱ्यांनी विजय वानखेड़े यांचे आभार मानले आहेत. संकटाच्या वेळी पोलिसांमुळे आपन सुरक्षित असतो पण पोलिसांना आपल्या परिवाराला वेळ देता येत नाही. त्यामुळे मी हा उपक्रम हाती घेतला असल्याच श्री. विजय वानखड़े यांनी सांगितले. आवश्यकते नुसार इतरही वेळेत पोलिस कर्मचारी व फक्त कर्तव्यावरिल डॉक्टरांनी सकाळी 8484909045 या क्रमांकावर फोन करून कळविल्यास सायंकाळी भाजीपाला त्यांना मोफत घरपोच मिळेल असे आवाहनही त्यांनी केलेलं आहे.

Related posts

सौर ऊर्जा व इलेक्ट्रिक लाईट तात्काळ सुरू करावे-आझाद हिंद संघटनेची मागणी

nirbhid swarajya

घरकुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महा आवास अभियान

nirbhid swarajya

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मद्दतीकरीता गायगाव येथील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!