खामगाव : भारतासह महाराष्ट्रभरात कोरोना संक्रमण विषाणू या अतिशय गंभीर आजाराने थैमान घातले आहे. या परिस्थितीत आपले संरक्षण दलातील पोलिस अधिकारी तसेच डॉक्टर नर्स हे सर्व आपला जिवाची पर्वा न करता केवळ आपल्या देशातील सर्व नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला नाही पाहिजे त्याकरिता रात्रंदिवस रस्त्यावर उतरून लढा देत आहेत तरी त्यांच्या ही आरोग्यावर कुठलाही विपरीत परिणाम न होवो त्याकरिता वापरलं जाणारे मास्क स्वताच्या हाताने शिलाई मशीनवर तयार करुन काळेगाव मधील अंगणवाडी मदतनीस सौ.दुर्गा श्रीकृष्ण जोहरी यांच्याकडून पिंपळगाव राजा पोलिस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी यांना वाटप करण्यात आले. सर्व पोलिसांनी त्यांच्या या कार्याची प्रशंसा करून आभार मानले.
previous post