November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

कडक शिस्तीचे एएसपी श्रवण दत्त होणार दोन दिवसात रुजू

अवैध धंदेवाल्यांना भरली धडकी

खामगांव : अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांची नुकतीच काही दिवसापूर्वी मुंबई येथे बदली झालेली आहे. त्यांच्या जागी जिंतूर येथून बदली झालेले श्रवण दत्त हे येत्या दोन दिवसात खामगाव विभागाचा पदभार घेणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दोन दिवसात रुजू झाल्यावर अवैध धंदे करणार्‍यांवर चांगलाच वचक बसणार आहे. श्रवण दत्त यांनी जिंतूर येथे एएसपी म्हणून सेवा देताना अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सक्त भूमिका बजावलेली आहे.

त्यांची ही ख्याती त्यांनी पदभार घेण्याआधीच खामगाव विभागात येऊन धडकली होती. त्यामुळे अवैध धंदे वाल्यांचे व गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते. कडक व शिस्तीचे अप्पर पोलीस अधीक्षक येणार असल्याचे कळताच अवैध धंदे करणाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून आपले अवैध धंदे बंद ठेवले आहेत. तर खामगावातील काही अवैध व्यवसायिकांनी आपला तळ दुसरीकडे हलवले आहेत.एएसपी राजपूत यांचे जागी जिंतूर येथून श्रवण दत्त हे येणार असल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील एका मोठ्या लोकप्रतिनिधीने त्यांची बदली रद्द करण्यासाठी फार मोठे प्रयोग सुद्धा केले होते मात्र त्यांची बदली होऊ शकली नाही. श्रवण दत्त यांनी जिंतूर येथे सेवा बजावताना अवैध धंदे कडक बंद केले होते,तर गुन्हेगारीवरही वचक निर्माण केला होता.

श्रवण दत्त हे कडक शिस्तीचे अधिकारी मानले जातात. गुन्हेगार मग तो राजकीय क्षेत्रातला असो की सामाजिक क्षेत्रातला नामांकीत असो की कुणीही असो गुन्हा दाखल करण्यासाठी ते जराही कचरत नाहीत. त्यामुळे खामगाव शहरासह खामगाव विभागातील अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. तर सामान्य व सभ्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा निरोप समारंभ सुद्धा करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात ते खामगाव विभागात रुजू होणार असल्याचे श्रवण दत्त यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्याप्रमाणेच त्यांची कार्यशैली असल्याची माहिती असून ते खामगाव विभागात काम करताना विभाग अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मुक्त करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related posts

ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणुन विद्यमान सरपंचांचीच नेमणुक करावी – सरपंच संघटनेची मागणी

nirbhid swarajya

महिलेने केला महिलेचा विनयभंग

nirbhid swarajya

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!