कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी ; झोनमधील व्यक्ती बाहेर आल्यास ५ हजार रूपये दंड
बुलडाणा : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनमधील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याठिकाणी संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी सक्तीने करणे आवश्यक आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील कंटेन्टमेंट झोनमधील कोणतीही आस्थापना, दुकाने उघडी ठेवू नये. याठिकाणी केवळ दवाखाने व मेडीकल उघडी राहतील. याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी दक्षता घ्यावी. तसेच कंटेन्टमेंट झोनमधील व्यक्ती झोनच्या बाहेर आल्यास संबंधितांवर ५००० रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
कंटेन्टमेंट झोनमधील नागरिकांच्या गरजा भागविण्यासाठी होम डीलीवरीचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत इन्सीडेंट कमांडर यांनी दररोज कंटेन्टमेंट झोनला भेट देवून आवश्यक वस्तूंची होम डिलीवरीची पाहणी करावी.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा २००५, साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंडसंहीता कलम १८८ नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
सौजन्य – Dio Buldana