खामगांव : संपुर्ण राज्य़भर भारतीय जनता पार्टीतर्फे ओ.बी.सी आरक्षणसाठी आंदोलन करण्यात आले. संपुर्ण बुलढाणा जिल्हयात देखील ठिकठिकाणी ओ.बी.सी.आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले. खामगांव येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर अकोला रोडवरील मोठा हनुमान मंदीर येथे बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपा सरकारने कायम सर्वोच्च़ न्यायालयापर्यंत टिकवलेले ओ.बी.सी. आरक्षण हे केवळ राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वातील नाकर्त्या महाविकास आघाडी सरकार मुळे गमवावे लागले आहे. राज्य़ सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध़ न केल्यामुळे आज ओ.बी.सी.चेच नाही तर राज्यातील मराठा आरक्षण देखील गमवावे लागले आहे. हे सरकार जनगणना व इम्पेरिकल डाटा यात गल्ल़त करीत आहे. त्यांना मुळातच इम्पेरिकल डाटा चा अर्थ समजला की नाही हा मोठा प्रश्ऩ आहे. राज्यातील आघाडी सरकार मध्ये बसलेले राज्यकर्ते यांना जर जनगणना व इम्पेरिकल डाटा याचा फरक समजत नसेल तर हे राज्य़ कशा प्रकारे चालवित आहेत हे या महाराष्ट्र्रातील जनतेने समजून घ्यावे. ओ.बी.सी आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अध्यादेश काढून सर्वोच्च़ न्यायालयात ओ.बी.सी. आरक्षण आवश्यक़ आहे अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात सरकार बदलले व शिवसेनेच्या नेतृत्वात आघाडी सरकार आले व त्यांनी सर्वोच्च् न्यायालयाने वारंवार सुचना देऊनही आरक्षणा बाबत बाजू न मांडल्यामुळे इम्पेरिकल डाटा उपलब्ध़ करुन न दिल्यामुळे अखेर सर्वोच्च् न्यायालयाने मराठा आरक्षणाप्रमाणेच ओ.बी.सी. आरक्ष्ण रदद केले. याचा त्रास सर्वसामान्य ओ.बी.सी. नेत्यांना होणार आहे. ओ.बी.सी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार आहेत. यातून ओ.बी.सी नेतृत्व़ संपविण्याचा घाट या सरकारने घातलेला दिसतो. मराठा आरक्षण असो की ओ.बी.सी. राज्य़ सरकारने दोन्ही बाबतीत केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेतली व तिच भुमिका राज्यातील करोडो मराठा व ओबीसी समाज बांधवांचे आयुष्य़ उध्वस्त़ करणारी ठरली आहे.
हे सरकार दोन्ही आरक्षण रदद़ करुन ओ.बी.सी. व मराठा आरक्षणाचा वाद निर्माण करुन मराठा व ओ.बी.सी. मध्ये भांडण लावून राजकीय फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु या सरकारच्या फोडा आणि राज्य़ करा या भुमिकेला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही व ओ.बी.सी व मराठा आरक्षणासाठी दोन्हीही घटक मोठे आंदोलन उभे करुन या सरकारला जागा दाखवून देतील. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात झालेले ओ.बी.सी आरक्षणाच्या आंदोलनात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया सेल चे पश्चिम विदर्भ संघटक सागर फुंडकर, खामगांव शहराच्या नगराध्यक्षा अनिता डवरे, न.प. उपाध्यक्ष संजय ऊर्फ मुन्नाभाऊ पुरवार, भाजपा किसान आघाडी अध्यक्ष गजाननराव देशमुख, संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, दिलीप पाटील, संतोष टाले, शांताराम बोधे, डॉ एकनाथ पाटील, जितेंद्र पुरोहित, राजेंद्र धनोकार, विजय महाले, नगेंद्र रोहणकार, पुंडलिकराव बोंबटकार, लाला महाले, विनोद टिकार, अशोक मानकर, संतोष येवले, संजय शर्मा, यांचे सह भाजपा पदाधिकारी, जि.प. पंचायत समिती सदस्य, युवा मोर्चा, महिला मोर्चा, युवती मोर्चा, विद्यार्थी आघाडी कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.