December 14, 2025
खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ सामाजिक

ओम साईराम ग्रुपच्या वतीने पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना ब्लँकेटचे वाटप…

खामगाव: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील ओम साईराम ग्रुपच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना सामाजिक बांधिलकी जपत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.ओम साईराम ग्रुप विविध सामाजिक, धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर राहला आहे. वर्षभर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, भोजन वाटप, गरजुंना मदत असे समाजपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रुपचे सर्व सदस्य निस्वार्थपणे उपक्रमासाठी सेवा देतात. दरम्यान सध्या हिवाळा सुरू झाला असून चांगलीच थंडीची हुडहुडी पसरलेली आहे. भर थंडीत शहरात अनेक गोरगरीब उघड्यावर झोपतात. याची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकी जपत ओम साईराम ग्रुप च्या वतीने अशा गोरगरीब नागरीकांना ब्लँकेट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचे हस्ते ब्ल्‍ाँकेट वाटप करण्यात आले. सर्वप्रथम येथील रेल्वे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महामानवांना अभिवादन करून शहीद दिनानिमित्त शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर येथील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, सामान्य रूग्णालय, फरशी, शनी मंदिर आदी परिसरात गरजुंना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी खामगाव प्रेस क्लब चे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, ओम साई राम ग्रुपचे मयुर शर्मा, महेश मोरजानी, इशांत खिरडकर, बंटी मोरजानी, शुभम डब्बे, विक्की बुधवाणी, भावेश नथ्थानी, प्रशांत कळमकार, कालीभाई बंगाली, वैभव वानखडे, निखिल दर्यानी, सौरभ गौंड, पंकज माडीवाले, सागर पंजाबी, अखिल मोहता, लखन लेखवानी, सानु गुरबानी, देवा गोसावी, वैभव आखुड, पंकज शेजोळे, बंटीशेठ मंत्री, मोहन उगले, राज पालीवाल, अतुल संत, निलेश लाड, यांच्यासह पत्रकार संभाजीराव टाले, अशोक जसवाणी, नितेश मानकर, मुबारक खान, सैय्यद अकबर, आनंद गायगोळ, आकाश पाटील, गणेश पानझाडे, सुनिल गुळवे, सुमित पवार, सिध्दांत उंबरकार आदी उपस्थित होते.

Related posts

खामंगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

nirbhid swarajya

मौजे कोलोरी येथे रु.71 लक्ष निधीच्या कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

nirbhid swarajya

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya
error: Content is protected !!