खामगाव : सध्या जगभरात कोरोना महामारिने थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग रोकण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन सुरू आहे. यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टनसिंग राखने जरूरी आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन खामगांव येथील ओम ऑप्टिकल्स यांनी दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी दुकानात प्रवेश करते वेळी सोशल डिस्टनसिंग राखावे यासाठी बोर्ड लावून जनजागृति करीत आहे. या मुळे शासनाच्या नियमांचे पालन होईल आणि दुकानदारला दंड सुद्धा लागणार नाही. या आधी सुद्धा ओम लॉटरी सेंटर खामगांव द्वारे पोलिस प्रशासन द्वारे आखुन दिलेल्या पांढऱ्या रेषेच्या आत वाहन ठेवन्याबाबत आदेश दिले होते. त्याबद्दल ची जनजागृति केल्याबद्दल पोलिस प्रशासन तर्फे संचालक मनीष खेतान यांचा शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी त्यांचा सत्कार केला होता. ओम ऑप्टिकल प्रमाणे सर्वांनी सोशल डिस्टनसिंग बाबत जनजागृती करणारे बोर्ड लावून जनजागृति करने आवश्यक आहे. या मुळे कोरोनाची साखळी तूटेल आणि कोरोना महामारीपासून निश्चित आपल्याला याचा फायदा होईल.