January 1, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

ओबीसी विरोधी राज्य सरकार बरखास्त करा – सागर फुंडकर

लोकशाहीचा गळा घोटत महाविकास आघाडीने केलेल्या १२ आमदारांचे निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने राज्यभर आंदोलन

खामगांव : ओबीसी विरोधी महाविकास आघाडीने भाजपाच्या १२ आमदारांना निलंबीत केले. हि कारवाई अन्यायकारक असून लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. राज्यातील महाविकास आघाडीने इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारने पुरवावा अशी मागणी केली, वास्तविक पाहता इम्पेरिकल डाटा हा राज्य मागासवर्ग आयोगाकडूनच घ्यायचा आहे. परंतु केवळ वेळकाढू धोरण अवलंबत राज्य सरकार केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागत आहे. यात वेळ वाया जाऊन ओबीसी आरक्षणाचा प्रश्न खोळंबणार आहे. काल महाविकास आघाडीचे मंत्री श्री छगनजी भुजबळ हे अधिवशेनात चुकीची माहिती देत असल्याबाबत आक्षेप घेतला व यामुळे ओबीसी आरक्षण मिळणार नसून त्यात खोळंबा ‍निर्माण होणार आहे, इंम्पेरिकल डाटा हा राज्य मागासवर्ग आयोगाकडून घ्यायचा आहे, हे आपल्याकडेच आहे त्यामुळे आपण तात्काळ घेऊन ओबीसी आरक्षण पुर्ववत होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने वेळकाढू धोरण न अवलंबता राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्फत अहवाल मागवून तो सादर करावा अशी मागणी करण्यात आली. परंतु सदरची मागणी न मानता ओबीसी विरोधी राज्यातील महाविकास आघाडीने केवळ राजकारण करत केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागावा अशी मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. याचा विरोध करीत भाजपाच्या आमदारांनी याबाबत जाब विचारला असता. भाजपाच्या १२ आमदारांना निलंबीत करण्यात आले.


याचा विरोध करण्यासाठी राज्यभरात व बुलढाणा जिल्हयात जिल्हाध्यक्ष आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करुन ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारचा तिव्र निषेध करीत राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. यासंदर्भात तहसिलदार खामगांव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा सोशल मिडीया सेल महाराष्ट्राचे सह संयोजक सागर फुंडकर, संजय शिनगारे, चंद्रशेखर पुरोहित, राजेंद्र धनोकार,डॉ एकनाथ पाटील, अपंग आघाडीच्या जिल्हा संयोजक ॲड. स्नेहा ओवे,शांताराम बोधे, डॉ गोपाल गव्हाळे, लक्ष्मणराव भांबेरे,जितेंद्र पुरोहित,संजय शर्मा, प्रमोद सरोदे, विलासराव देशमुख, हिरालाल बोर्डे, सतिष गवळी, दिलीप शेटये, श्याम आंबेकर, दिगंबर गलांडे, संजय ठोंबरे, रमेश पुंडलिक डवंगे, गणेश सोनाने, त्रंबक बनकर, उपस्थित होते.

Related posts

देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही आधाराची गरज..

nirbhid swarajya

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील

nirbhid swarajya

कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाचे पुष्पवृष्टी करून केले स्वागत

nirbhid swarajya
error: Content is protected !!