बँक खात्यातून २ लाख ८० हजार उडवले
खामगाव : येथील महाराष्ट्र बटालियन मध्ये कार्यरत असलेले एका कर्मचाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्हाला गिफ्ट लागलेले आहे,असे आमिष दाखवून बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने २ लाख ८० हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील महाराष्ट्र बटालियन मधे कार्यरत असलेले रमेश नरबहादुर थापा यांना त्यांचा दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला होता. त्यांना त्या व्यक्तीने सांगितले की तुम्हाला २५०० रुपयाची एक गिफ्ट लागलेले आहे, त्याकरिता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार आहे. थापा यांना २५०० रुपयाच्या गिफ्टच्या बदल्यांमध्ये त्यांनी त्या व्यक्तीला आपला मोबाइल नंबर वर आलेला ओटीपी सांगितला.
त्यानंतर त्यांच्या खात्यातील १ लाख ९९ हजार रुपये विड्रॉल झाले व दुसऱ्यांदा ८० हजार रुपये विड्रॉल झाले. असे एकूण २ लाख ७९ हजार रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यातून गायब झाली. थापा यांना मॅसेज आल्यानंतर त्यांच्या हे सर्व प्रकरण लक्षात आले. त्यांनी तात्काळ या प्रकरणाची माहिती बँकेत असलेल्या अधिकाऱ्यांना दिली,मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जाण्यास सांगितले. थापा यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५२८/२१ कलम ४२० भादवी सहकलम ६६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे. असे प्रकार शहरात वारंवार होऊन सुद्धा लोक अशा आमिषाला बळी पडत आहेत. आतातरी नागरिकांनी कोणालाही आपला ओटीपी किंवा आधार क्रमांक देऊ नये असे आव्हान शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे.