खामगाव : चिखली रोड वरील भीम नगर फाट्याजवळ विचित्र अपघातात एकाचा मृत्यु झाला असून १६ जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक MH-४०-AQ-६३३९ बुलडाणा कडून उंद्री मार्गे पातुर्डा कडे जात असताना चिखली रोड़वरिल भीम नगर फाट्याजवळ गावमधून ४०७ वाहन क्रमांक MH-२८-H-८५७९ ही अचानक आल्याने बसला समोरुन जोरदार धडक बसली तर बसच्या मागे असलेल्या क्रुझर क्रमांक MH-२८- AN-२३२८ ची धडक बसला लागली. यामधे ४०७ मधील गजानन गाढवे ह्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यु झाला असून बस मधील वाहक व चालक जखमी झाले तर क्रुझर मधील एका मुलीच्या पायाला टाके पडले आहेत. ४०७ मधील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तात्काळ सर्व जखमींना येथील सामान्य रुग्णालयात आणले असून त्यांच्यावर उपचार करून त्यामधील ६ जणाची प्रकृति गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले असून एसटीचे वाहक व चालक यांना येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले होते व अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात सविता इंगळे, संगीता इंगळे , विश्वनाथ चेके,कविता देशमुख, अपर्णा देशमुख, सुनील डाबर,विजयसिंग पवार सुनील डोंगरे, पुरुषोत्तम चेके,भावना देशमुख, बापूराव मानवतकार, प्रशांत भालेराव,देवानंद चेके, ज्ञानेश्वर चेके,दिगंबर चेके, महादेव धनोकार, रतन चव्हाण, चोविन पवार जखमी झाले आहेत.बातमी लिहेपर्यंत पोलिसांची पुढील करवाई सुरु होती.
previous post