January 4, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

एसडीपीओ पथकाने पकडला अवैध देशी दारूचा साठा

खामगाव : जिल्ह्यात सद्या कोरोना पेशंटचा आकडा वाढताना दिसत आहे. तर एकीकडे अवैध धंदे जोमात सुरू आहे. अप्पर पोलीस अधीक्षक पथक, शेगाव शहर व ग्रामीण, खामगाव शहर व ग्रामीण पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम हातात घेतली आहे. मात्र आज दोन महिन्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत दारूसाठा जप्त केल्याची प्रेस नोट सोडण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने दिलेल्या महितीनुसार, येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने १-५-२१ रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास अवैधरित्या देशी दारूचा साठा करणाऱ्या इसमाला राहत्या घरी छापा मारून पकडले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी विजय नंदकिशोर जयस्वाल वय ६५ रा. पहूरजिरा यांच्या घरी छापा टाकला असतात त्याच्या घरून अवैधरित्या साठवलेला देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये टॅंगो पंच कंपनीच्या १८० मिली च्या ४८ बॉटल असलेले ४ बॉक्स किंमत १२०६४ रु , ९० मिली च्या १०० बॉटल असलेले ९ बॉक्स कि. २७००० हजार रु. व संजीवनी बॉबी कंपनीच्या ९० मिली च्या १०० बॉटल असलेले ६ बॉक्स किं.१८००० रु.असा एकूण ५७०६४ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय नंदकिशोर जयस्वाल याच्याविरुद्ध कलम १८८,२६९,२७० भादवि ५१ ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत व उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिस उपनिरीक्षक रंजीतसिंह ठाकुर, महिला पोहेकॉ संध्या ताठरकर ,शांताराम खाळपे,चालक नापोकॉ अमित चंदेल यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी पथक हे जागे झाल्याचे दिसून येत आहे,अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवैधरित्या धंदे चालविणार्‍या विरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. यातच खामगाव मध्ये उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, पिंपळगाव राजा, जलंब, शेगाव शहर, शेगाव ग्रामीण,हिवरखेड पोलिस स्टेशन येतात. मात्र दोन महिन्यांपासून या पोलिस स्टेशन अंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी पथकामार्फत कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची चर्चा नागरीक करताना दिसत आहे. याबाबत आज तब्बल दोन महिन्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत आज दुपारी एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील याबाबतची खमंग चर्चा सुरू आहे.

Related posts

खाजगी कोविड रुग्णालयातील १३ डॉक्टरानी दिले सामूहिक राजीनामे

nirbhid swarajya

जिल्हाशल्य चिकित्सकांच्या हलगर्जी पणामुळे पोलिसाचा मृत्यु; नातेवाईकांचा आरोप

nirbhid swarajya

खामगाव तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा संपन्न,अनेक प्रकरणांना मंजुरात

nirbhid swarajya
error: Content is protected !!