अंत्री खेडेकर शिवारातील खळबळजनक घटना
चिखली:तालुक्यातील अंत्री खेडेकर गावाजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत मिळालेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली तालुक्यातील अंत्रि खेडेकर येथील काही ग्रामस्थ आज सकाळी फिरण्यासाठी मेरा खुर्द गावाच्या दिशेने जात असताना एका तरुणीचा मृतदेह दिसून आला. यावेळी ग्रामस्थानी तात्काळ अंढेरा पोलिसांना याची माहिती दिली. याची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा सुरु करुन श्वानपथक आणि ठसेतज्ञ यांना बोलावण्यात आले. यावेळी पोलिसांनी दीलेल्या महितीनुसार माधुरी भीमराव मोरे वय २५ असे तरुणीचे नाव आहे. तिचा गळा चिरलेला, हातापायावर चाकूचे वार, अंगावर चटके दिल्याचे निशाण माधुरीच्या मृतदेहावर पोलिसांना दिसले.यावरून हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.माधुरी ही बुलडाणा एस टी विभागात बस वाहक या पदावर कार्यरत होती. माधुरी चे आपल्या वडिलांसोबत दोन दिवसा पहिलेच बोलणे झाले होते. त्यावेळेस तिने सांगितले की ती आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच साखळी ता. बुलढाणा येथे मुक्कामी राहणार आहे व ड्युटी करून आज त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने ती अंत्री खेडेकरला घरी जाणार होती. मात्र घरी येण्याच्या पहिले माधुरीचा मृतदेह अंत्रि खेडेकर च्या शिवारात आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली. माधुरीचा ५ वर्षापुर्वी घटस्फोट झाला होता तर यापूर्वी ती जाफराबाद आगारात कार्यरत होती. तेथे असताना एक एसटी वाहक नेहमी तीची छेड काढायचा.त्याच्या त्रासाला कंटाळून तिने बुलढाणा आगारात आपली बदली करून घेतली होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे. माधुरीवर खून करण्यापूर्वी बलात्कार झाल्याचा संशय सुद्धा पोलिसांनी वर्तविला आहे. माधुरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर नेमके क़ाय घडले हे स्पष्ट होणार आहे.