October 6, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ

एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय सील!

उच्च न्यायालयाचा दणका; महामंडळ प्रशासन हादरले…

बुलढाणा: कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागीय कार्यालय आज गुरुवारी संध्याकाळी उशिरा सील करण्यात आले! यानंतरही महामंडळ ताळ्यावर आले नाही तर, कार्यलयाच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने महामंडळाचे मुख्यालय हादरले आहे.१९ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल ५३ लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहे. उच्च न्यायालयाने मागील २५ सप्टेंबर रोजी रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते मात्र दोन महिन्याचा कालावधी उलटूनही महामंडळाने गांभीर्याने विषय घेतला नाही. त्यामुळे त्यांची जमीन जप्त करून आज शासनाच्या नावे करण्यात आली. तसेच तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने आज मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालय सील करण्यात आले. दरम्यान उद्या शुक्रवारपर्यंत जर त्यांनी धनादेश दिला नाही तर जप्त जमिनीची लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यालय प्रशासन व बुलढाणा विभाग हादरला आहे.

Related posts

लाडक्या बाप्पांना खामगावात श्रध्देचा निरोप!

nirbhid swarajya

महाराष्ट्र राज्य कलावंत न्याय हक्क समिती चे तहसीलदार यांना निवेदन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त ३३ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’;तर ०३ पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!