January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र

एलसीबी विरोधात फेसबुकवर आपत्तीजनक कमेंट करणे पडले महाग

खामगांव येथील इसमा विरुद्ध गुन्हा दाखल


खामगांव : बुलडाणा एलसीबीच्या एका पथका द्वारे केलेली कार्रवाईची बातमी फेसबुकच्या पेजवर पोस्ट झाली असता येथील एका विघ्नसंतोषीने पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी कमेंट त्या फेसबुक पेजच्या पोस्ट खाली केल्याने त्याच्या विरोधात खामगांव शहर स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीची भूमिका महत्वाची असते. एलसीबीचे अधिकारी,कर्मचारी जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडते. बुलडाणा एलसीबीच्या एका पथकाने बुलडाणा येथील एका अट्टल मोबाइल चोराला अटक करून त्याच्याकडून काही मोबाइल जप्त केले होते.याची बातमी एका ऍप च्या फेसबुक पेजवर 25 जुलै रोजी प्रसारित झाली होती.या बातमी संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये येथील आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने एलसीबी पथकाची अर्थात पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारी व आक्षेपहार्य कमेंट पोस्ट केली आहे. याची बुलडाणा एलसीबीला माहिती झाली.या प्रकरणी फेसबुक वापरकर्ता इसम विठ्ठोबा पंढरी वाघमारे याने अत्यंत बेजबाबदारपणाने सदरची पोस्ट प्रसारित केल्याने पोलिस दला विषयी समाजा मध्ये अप्रीतिची भावना निर्माण झाली आहे,त्यामुळे बुलडाणा एलसीबीच्या वतीने या प्रकरणी कॉन्स्टेबल नदीम शेख यांच्या तक्रारीवर फेसबुक पेजवर पोलिसा विरोधात आपत्तीजनक टिप्पणी करणाऱ्या आरोपी विठ्ठोबा पंढरी वाघमारे विरुद्ध शुक्रवार दि.21 ऑगस्ट रोजी पोलिस (अप्रीतिची भावना चेतावणे) अधिनियम 1922 ची कलम 3 अन्वये खामगांव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

Related posts

गुटखा पकडला ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडले

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त ६ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya
error: Content is protected !!