खामगाव- स्थानीक गुन्हे शाखा बुलढाणाच्या खामगाव बीट मधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आज १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सुमारे अर्धा तास शहरातील वरली मटका चालविणारा सह इतर अवैध धंदेवाईकांच्या मुलाखती घेतल्या पोहेका मुन्ना ठाकूर व नापोका केदार फाळके हे दोघे शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणातील बाकावर बसून एकेकाला बोलावून मुलाखत घेत होते.त्यामुळे एलसीबी पथकातील दोघांचा शहर पोस्टेच्या आवारात खाबुगिरीचा धांडोळा मांडल्या असल्याने चित्र दिसून आले आहे.या खाबुगिरी बाबत झालेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सुद्धा निर्भिड स्वराज्य कडे उपलब्ध आहे.या मुलाखती नेमक्या कशासाठी होत्या याबाबत खुद्द पोलिस वर्तुळातच चर्चा होत आहे.तर अशा मुलाखती कश्यासाठी घेतात. हे सुज्ञास सांगणे न लगे!!
अवैध धंद्याला उधान
शहरात अवैध दारू विक्री,गांजा विक्री,वरली मटका जुगार आदी अवैध व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत आहेत.या अवैध धंद्याबाबत पोलीस अनभिज्ञ आहेत असे नाही पण अर्थपूर्ण व्यवहारातून याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केली जात आहे.अवैध धंदे बंद करण्याबाबत माजी आ.दिलीपकुमार सानंदा वारंवार पोलीस प्रशासनाकडे मागणी करीत आहेत. तर ११ एप्रिल २०२३ रोजी शंकर नगर मधील महिलांनी अवैध दारू विक्री, व वरली मटका, जूगार, गांजा विक्री बंद करण्याबाबत खामगांव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांना निवेदन दिले व काही वेळ ठिय्या मांडला होता.या सर्व बाबी शहरातील अवैद्य धंद्यांची वस्तुस्थिती दर्शवीत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
