November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

एमआयडीसी मधून तुर कट्टे चोरी प्रकरणातील ७ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

खामगांव : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ खामगाव भांडारपाल दिपिका ज्ञानेश्‍वर खोडके यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये २३ जानेवारी रोजी तक्रार केली होती की एमआयडीसी सहयोग संकुल जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या गोडाऊन मधून २२ जानेवारी रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सेंटर लॉक ची पट्टी वाकून मधील ९२ कट्टे अं किं २ लाख ९३ हजार ४८० ची तूर लंपास केली होती.भांडारपाल यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम ४६१ ,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास केला असता शिवाजीनगर पोलिसांनी विश्वनाथ कीसन चौके ,अनिल चंद्रभान घटे, ज्ञानेश्वर त्र्यंबक बगे, अमोल रमेश मुंडाले, संदीप सुरेश हिंगणे, निवृत्ती उर्फ संप्पा भगवान हिंगणे, समाधान सोपान पाखरे या ७ आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी एम.आय.डी.सी येथून ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली व त्यांच्या कडून ८० क्विंटल तुर २ बोलेरो पिकअप क्र. MH-३०-AB २४५९ व MH-२८ BB ०६१९ व १ मोटर सायकल असा एकूण १३ लाख ३८ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील हुड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार, सुनील तायडे, गजानन कराळे, अरविंद घोडके,संदीप टाकसाळ, शैलेंद्र सिंग राजपूत, देवेन्द्र शेळके, अनिल शिंदे, रवींद्र कन्नर, राम धामोडे, सागर भगत, बाळकृष्ण फुंडकर यांनी केली आहे.

Related posts

शेगाव येथून संग्रामपूर कडे जाणाऱ्या एसटी बसला कारची धडक

nirbhid swarajya

बुलडाण्यात कोरोना पॉझेटीव्ह मृत रुग्णाच्या परिसरामध्ये शासनाचा रेड अलर्ट

nirbhid swarajya

स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या निर्मितीनंतर ३० वर्षात एकदाही निवडणूक नाही

nirbhid swarajya
error: Content is protected !!