खामगांव : नांदुरा शहराकडून खामगांव कड़े एक इसम विनानंबरच्या दुचाकीवरुन गुटखा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली होती. त्या महितीच्या आधारे पोलिसांनी शेख रहेमान शेख चाँद अत्तार रा. फाटकपूरा यास आज दुपारी 3 च्या सुमारास एम आय डी सी चौकातुन दुचाकीवर गुटखा घेऊन जाताना पोलिसांना मिळून आला. त्यावेळी त्याची झड़ती घेतली असता त्याच्या कडून १६ हजार रुपये किमंतीचा विमल गुटखा व दुचाकीसह असा एकूण ३१ हजाराचा माल जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले असुन, पुढील कारवाई करिता अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. ही कारवाई पीएसआय कटारे, पोका अनंता फरतडे,पोका राम धामोड़े यांनी केली आहे.
