April 18, 2025
खामगाव जिल्हा विदर्भ शिक्षण शेगांव

एन . व्ही . चिन्मय विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश.      

शेगाव :- केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत सीबीएसई अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २२ जुलै रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला . यामध्ये चिन्मय विद्यालय शेगाव येथील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे . आणि विद्यालयाचा निकाल शंभर टक्के जाहीर झाला आहे . चिन्मय विद्यालयातील प्रथमं स्थानावर असलेला प्रणव चांडक हा ९ ७.२० टक्के गुण घेऊन यशस्वी झाला त्यानंतर कु . अदिती शर्मा ९ ५.६० टक्के तसेच कु . प्रणिता सोमानी हिने ९ ५.२० टक्के , गोविंद शर्मा व पूर्वी भट्टड यांनी सुध्दा ९ ५.२० टक्के तसेच वेदांत पालीवाल याने ९ ५ टक्के मार्क मिळवून यश प्राप्त केले आणि प्रणव चांडक आणि प्रणिता सोमानी यांना संस्कृत आणि सामाजिक अभ्यास ( एएऊ ) या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत . यामध्ये शाळेचे प्राचार्य किशोर कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . अनिल चौधरी यांचा सुद्धा सहभाग आहे . चिन्मय विद्यालयाच्या या यशासाठी विद्यालयाच्या शिक्षक वृंदांनी अभ्यासक्रमासोबतच अभ्यासक्रम क्रियाकलापामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी परिश्रम घेतले . याचबरोबर ९ ० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी सुद्धा आहेत . या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संपूर्ण विद्यालयाच्या शिक्षकवृंदानी केले . विद्यालयाच्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन सर्व शिक्षकांनी केले . ( श.प्र . )

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 450 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 72 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून दिले शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक

nirbhid swarajya

कोविड लसीकरणाच्या तयारीसाठी ‘रंगीत तालीम’

nirbhid swarajya
error: Content is protected !!