खामगाव: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल २९ ऑगस्ट रोजी जाहीर झाला असून यामध्ये ए.के.नॅशनल हायस्कूलचा विद्यार्थी अपूर्व नाना हिवराळे हा एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.आर्थिक, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे दरवर्षी ‘आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना’ परीक्षा (एनएमएमएस) घेतली जाते.दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयुक्त असलेल्या या परीक्षेबाबत राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून,त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साह्य करावे.त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी,यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा घेतली जात असते.लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते.पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी बारा हजार रुपये याप्रमाने चार वर्षापर्यंत ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.अपुर्व हिवराळे यास डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव चे संचालक डी.पी.दांडगे सर,प्रा. विवेक दांडगे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. आपल्या यशाचे श्रेय तो शिक्षकवृंद व आई वडीलांना देतो.अपुर्व च्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.