काही गोष्टी किती वेगात घडत जातात आणि पहाता पहाता कधी गंभीर वळण घेतात आपल्याला कळतही नाही.दि 12 ला मला अस्वस्थ वाटायला लागले मी 12 आणि 13 ता स्वतःला घरीच ऑब्झअर करत होतो अक्सिमिटर 97 वरून 90 च्या रेशो खाली येण्याची सुरुवात झाली होती माझी चिंता वाढायला लागली होती मी लगेच दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला माझे मित्र घनश्याम पाटील दांदळेंना फोन केला व सर्व सांगितले ते ताबडतोब गाडी घेऊन माझ्या घरी आले तो पर्यंत आता मला अशक्त पणा सुद्धा जाणवायला लागला होता.आम्ही सर्व डॉ श्रीकांत काळे सर कडे गेलो तेव्हा दुपारचे 3 वा.असतील गोळ्या औषध घेतली आणि नाही जमल तर उद्या HRCT करू अस सर बोलले.मी मान हलवली व निघालो घरून गाडीत बसून आलो वापस जातांना मात्र मी मागच्या सीटवर झोपलो गाडी घरा समोर पोहचली व मी उतरून चालायला लागलो तेव्हा मी श्वास सुद्धा घ्यायला संघर्ष करत असल्याचे माझ्या लक्षात आले.काही वेळ गाडीतच थांबण्याचा निर्णय मी घेतला नंतर नंतर तर थुंकलो तर रक्त पडत असल्याचे सुद्धा मला जाणवले माझ्या सोबत माझी बायको रुपाली व मुलगा शंभू होता हे सर्व पाहून ते घाबरून गोंधळून जातील म्हणून मी तिच्या पासून ते लपवले व मला छान वाटते तुम्ही घरी थांबा मी थोड्या वेळात येतो म्हणून त्यांना घरात पाठवून दिले व मी गाडीतच थांबलो.डोक्यात खूप विचारांचे काहूर मजले होते.घनश्याम पाटील म्हणाले दादा आपल्याला घरी नाही ताबडतोब कुठतरी ऍडमिट व्हावं लागते अस वाटत आहे.तुम्ही हलगर्जी करू नका गाडी कोणाकडे घेऊ सांगा!तेव्हा मी डॉ निलेश पाटील धनंजय मिश्रा विलास ताथोड यांना फोन लावून परिस्तिथी सांगितली त्यांनी मला ताबडतोब ozone ला बोलावले व ते सर्व जण माझ्या आधी तिथे हजर झाले . डॉ श्रीकांत काळे सरांनी mss पाठवला व लगेच HRCT करण्यात आली मी पुन्हा गाडीत येऊन झोपलो हे सर्व मंडळी रिपोर्ट हातात घेऊनच बाहेर आले.सर्वांच्या चेहऱ्यावरुन व धावपळीवरून मला काहीतरी गडबड असल्याचे जाणवत होत. मी गाडीच्या काचेतून विलासला ईशारा करून काय झाल विचारल तो जवळ आला आणि गेट उघडून हरामखोरा एवढा उशीर का केला म्हणून रागात बोलू लागला गेट बंद करून गाडीच्या बाहेर काही तरी बडबडत होता त्याला धनंजय व डॉ काही तरी सांगत होते मग पुन्हा सर्व माझ्या जवळ आले व त्यांनी मला तुझा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगून हिम्मत ठेव आम्ही icu बेडच्या साठी प्रयत्न करत असल्याचे बोलले.अकोल्यात कुठेही एक icu बेड त्या दिवशी उपलब्द नव्हता! ते सर्व जण बहुतेक डॉ विनीत दादा,डॉ झिशन हुशेन डॉ प्रवीण पाटील यांच्या सोबत चर्चा, संपर्कात असतील कारण ह्या मंडळींचे फोन मला गाडीत सुद्धा येत होते.ते मला धीर देत होते.सर्व गोष्टींना आता संध्याकाळ झाली होती रिपोर्ट आला होता 25% पैकी 18 ते 20 %भाग इन्फेक्टेड होता सर्वांची धावपळ चालू होती मला icu मिळावा म्हणून सर्व कामाला लागले मला आता बोलणे सुद्धा जमत नव्हते शेवटी निर्णय झाला मोर्चा gmc ला वळवायचा त्या दिवशी अकोल्यातील कोणत्याच हायस्पीड ला icu बेड उपलब्द नव्हता काहीही करून एक दिवस तरी gmc ला काढण्या शिवाय दुसरा मार्ग नव्हता तिथे सुद्धा बेड उपलब्द नव्हता मला 12/13 नं च्या वार्डात शिप्ट करून सर्वांची धावपळ सुरूच होती मी आत मध्ये बेडवर फक्त पडलेला होतो तोंडातून आवाज निघत नव्हता माझ्या बेडच्या बाजूला डेड बॉडी आहे तिकडे सरका असा आवाज मला येत होता पण मी हतबल होतो.थोडा वेळाने माझ्या अर्ध्या बेडवर कोणीतरी पत्रवाडी ठेवली व त्यावर भात आणि वांग्याची भाजी ठेवली.आपली ताकत टिकावी म्हणून पूर्ण ताकद लावून दोन तीन घास खाण्याचा प्रयत्न केला.बऱ्याच लोकांजवल पाण्याच्या बॉटल दिसत होत्या पण कोविडचा वार्ड असल्या मुळे कोणाच्या बोटलने पाणी पिण्याची हिम्मत होत नव्हती.बाहेर सर्व मित्र मंडळ जिवाच्या आकांताने माझ्या साठी icu शोधत होते.तेवढ्यात एक फोन आला माझा आवाज निघत नव्हता तरी त्या फोनवर बोलणे मला किती महत्वाचे आहे हे माहीत होते म्हणून फोन उचलल्या बरोबर मी आधी एवढंच म्हटलं मला बोलता येत नाही माझा आवाज सुद्धा निघत नाही मला इथून काढा ! समोरून आवाज आला दादा काळजी करू नका आम्ही सर्व बाहेर उभे आहोत तुम्हाला ताबडतोब icuला शिप्ट करतो व्येवस्था लावत आहो.तो फोन होता संदीप पाटील महल्ले यांचा दादा धीर धारा अभय दादांचे व मा.राजेश टोपेंचे बोलणे चालू आहे तुमच्या साठी टोपे साहेबांनी फोन केला आहे अभय दादा त्यांच्या संपर्कात आहेत ते व्येवस्था करत आहेत आपल्याला icu चा बेट मिळणार थोडी कड काढा दादा! त्यानंतर अर्ध्या एका तासात वार्ड मध्ये आवाज आला अविनाश पाटील नाकट कोण आहे मी मान उचलू शकत नव्हतो पण हात पूर्ण वर करून इशारा देत होतो तो व्यक्ती माझ्या जवळ आला आणि म्हणाला चलो आपको दुसरे वार्ड मे जाणा है! अरे आपकोतो स्ट्रेचर चाहीए म्हणून तो वापस निघून गेला आणि थोड्या वेळातच व्हील चअर घेऊन आला.मला बसवून तो बिल्डिंमधून फिरवत फिरवत icu वार्ड मध्ये घेऊन आला.आता मी icu मध्ये होतो ऑक्सिजन मिळाला बर वाटायला लागले पण उभं राहता येत नव्हतं ऑक्सिजन काढला तर श्वास घेता येत नव्हता.पण ट्रीटमेंट चालू झाली होती आणि ऑक्सिजन चा आधार मिळाला होता माझ्या आशा पल्लवित झाल्या पण वार्डातील रोज तीन चार लोक जीव सोडत असल्याचे पाहून भीती कायम होती. 14 ता.चीसकाळ icu मध्ये पाहून खूप सेफ वाटत होत या सर्व धावपळीत माझा साळा अनंत मानकर सावली सारखा माझ्या सोबत होता.सिक्युरिटी सोबत विनंती करून कसही करून तो माझ्या आस पास राहत होता.त्याने सकाळी मला घरचे जेवण पोटभर खाऊ घातले कोविडचा वार्ड असल्याने मी त्याला येण्यास मनाई करत होतो पण तो मला काही सोडत नव्हता तो मला घरचे जेवण गरम पाणी कमी पडू देत नव्हता आता मी बेडवर बसू शकत होतो फक्त अजून खाली उभं राहणे जमत नव्हतं छातीत दुखणे व थुंकीतून रक्त पडणे चालूच होते.
तिसऱ्या दिवशी दोन्ही गोष्टी कमी होत असल्याचे लक्षात येऊ लागले मी उठून स्वतः उभा राहून थोडा चालायला लागलो तो पर्यंत माझे दोन डोज घेणे झाले होते मी बऱ्यापैकी दुरुस्त होत असल्याचे मला जाणवत होते.मी icu ला ऍडमिट झल्या पासून कोणी तरी गृहस्थ ppe किट मुळे ओळखता येत नव्हते ते माझ्या बेड जवळ येऊन पायाच्या आंग्ठ्यांना पाण्याचे दोन थेंब लावून एक लहानशी पुडी माझ्या खिशात घालायचे मी तीनचार दिवसांनी त्यांना प्रामाणिक पणे सांगितले दादा मी हे मानत नाही मी भगतसिंग सारखा नास्तिक आहे.त्यावर ते म्हणाले तुमच्या भगतसिंग चा प्रसाद समजून ठेवा खिशात! आता काय बोलावे मला समजत नव्हते! मी हसून त्या पुड्या खिशात जमा करत राहलो त्या आजही माझ्या जवळ आहेत त्यांच्या मनात माझ्या बद्दलच्या भावनेचा आदर करून मला त्यांचेही आभार मानायचे आहेत ही पोष्ट त्यांच्या वाचण्यात आल्यास त्यांनी संपर्क करावा हिच विनंती! मित्रांनो दि 16 ता.संध्याकाळी डॉ राम शिंदे सरांचा फोन आला अविनाश ICON ला एक बेड झाला येऊंजा आणि 16 ता रात्री 10 संदीप भाऊ,घनश्याम पाटील यांनी मला मला ICON ला शिप्ट केले डॉ एस एम अग्रवाल सरांची ट्रीटमेंट चालू झाली.आत्ता मी ICON ला icu मध्ये आहे सकाळीच डॉ साहेबांनी सांगितले अविनाश तू डेंजर झोनच्या बाहेर आला काही कळजी करूनको!औषध चे डोज पूर्ण झालेकी लवकरच सुट्टी देतो अस ते म्हणाले! GMC,ICON,OZEN च्या सर्व डॉ व आरोग्य कर्मचाऱ्यांन चे सुद्धा धन्यवाद! मी एक संकल्प केला आहे gmc मध्ये सर्व काही आहे फक्त स्टाफ आणि स्वछते चा विषय आहे त्या साठी संजू बप्पू देशमुख यांच्या सोबत रितसर चर्चा व परमिशन घेऊन रोज दोन तास वार्ड सफाईचे काम करणार आहे. तसेच कोणाला इमरर्जेंशी असल्यास मला कधीही फोन करा मी माझी गाडी घेऊन येऊन कोविडच्या पेशंटला व्येवस्थीत एडमिड करून देई परेंत तुमच्या सोबत राहील! मित्रांनो एवढं लिहण्याचे कारण एकच कोरोनाला हलक्यात घेऊ नका आपली व परिवाराची काळजी घ्या!कोणत्याही सिमटन्स कडे दुर्लक्ष करूनका परिस्तिथी कधीही गंभीर रूप घेऊ शकते हा माझा अनुभव आहे. प्रशासकीय अधिकारी GMC संजू बाप्पू देशमुख डॉ घोरपडे सर,डॉ अष्टपुत्रे सर डॉ कोरडे म्याडम सर्व माझी विचारपूस करून लक्ष देत होते बाहेरून आमचे मित्र सामाजिक व शेतकरी चळवळीतील स्नेही मंडळी तसेच डॉ अभय दादा,डॉ मोरे सर,आ.अमोल दादा मिटकरी कृष्णाभाऊ अंधारे,डॉ नारे सर, नारे म्याडम,ललित दादा बहाळे ऍड संतोष गावंडे डॉ मनतकार,अतुल भुयार अरुण नाकट सर्व मंडळी परिस्तितीवर नियंत्रण ठेऊन होती.अनेकांनी माझ्या कुटुंबाला फोन करून धीर दिला अनेकांनी मला न कळू देता माझ्या साठी खूप काही प्रयत्न केले.त्या सर्वांचे मनपूर्वक आभार!
अविनाश पाटील नाकट
अकोला
9423429444
साभार:- सोशल मीडिया