खामगांव :संध्याकाळचे ७:३० वाजले होते…. पोलिसांच्या तीन गाड्या नांदुरा रोड वरील कोर्टासमोर उभ्या आहेत. कुछ तो हो गया…अश्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाल्या……काही या बाबत पत्रकारांना सुद्धा याबाबतची विचारणा करण्यात आली. खामगाव शहर पहिलेच अफवांचे शहर म्हणून ओळखल्या जाते. छोटीशी गोष्ट मोठी करून वाऱ्यासारखी शहरात पसरविले जाते. या घटनेचे जसे इतर लोकांना कॉल आले तसेस निर्भिड स्वराज्यच्या टीमला सुद्धा या बाबतचे कॉल आले. निर्भिड स्वराज्यची टीम घटनास्थळी पोहचली. आणि तेथे उपस्थित कर्मचारी व पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अमरावती येथील एका युवतीवर झालेल्या अतिप्रसंगाच्या गुन्ह्याच्या प्रकरणातील स्पॉट पंचनाम्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, अशी माहिती निर्भीड स्वराज्यशी बोलताना दिली. ती कुठलीही मोठी घटना नाही… कोणताही मोठा प्रकार घडला नव्हता…तर तो होता स्पॉट पंचनामा….. पंचनामा….. पंचनामा…..
previous post
next post