खामगाव : खामगाव येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचा विद्युत ताराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक ३० मे रोजी सायंकाळ च्या सुमारास घडली.
शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकिर भूरू पटेल (22) भुरू घासी पटेल (52) जावेद भूरू पटेल (25)
साजेदा बी भूरू पटेल (50) हे घरात असताना विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यातील जावेद याचे ७ जून तर जाकिर याचे ८ जून
ला लग्न असून एकाची सासरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगांव मधील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगर चे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र ही घटनेतील चौघांचा मृत्यू की आत्महत्या हे अद्यापही अस्पष्ट आहे.