खामगाव : उसनवारीचे पैसे मागितल्यामुळे लोखंडी आरीने मारहाण करून चाकूने डोक्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटनादोन दिवसांपूर्वी घडली आहे. तालुक्यातील उमरा-लासुरा येथील रहिवासी डिगांबर दिनकरराव ठाकरे यांनी उसनवारीचे १ लाख रूपये उमेश नारायण ठाकरे याला १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मागितले होते. यावेळी भट्टीवाल्याकडे माझे पैसे आहेत. त्याच्याकडे चल असे म्हटले. मोटारसायकलने दोघे जात असताना रस्त्याच्या मधात उमेश ठाकरे याने डिगांबर ठाकरे याला लोखंडी आरीने पोटावर, हातावर व मानेवर मारून जखमी केले. डिगांबर ठाकरे यांनी आरी पकडून मोडली असता उमेश ठाकरे याने खिशातून चाकू काढून डोक्यावर सपासप मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी डिगांबर ठाकरे यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरूध्द भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला.
previous post