April 19, 2025
अमरावती आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शिक्षण

उपविभागीय अधिकारी यांना खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांनी दिले निवेदन

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ५० टक्के क्षमतेवर परवानगी देण्याची मागणी…

खामगांव : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट देखील तीन टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आला आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या निकषानुसार बुलडाणा जिल्हा अनलॉक च्या पहिल्या लेव्हल मध्ये आला असून सोमवारपासून सर्व प्रकारची दुकाने व इतर सेवा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केला आहे. यामध्ये शॉपिंग मॉल , सिनेमागृहे , थिएटर यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे, मात्र सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे , खाजगी कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय हे सुरू करण्यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही , त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान पाहता ५० टक्के क्षमते सह खाजगी कोचिंग क्लासेस ना सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलडाणा कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या सोबत प्रोफेशनल टीचर असोसिएशन ने चर्चा केली की, सर्व क्लासेसचे संचालक शासनाचे सर्व प्रकारचे महसूलचा भरणा करत असतात व वेळोवेळी शासनाला मदत करतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस संचालकांना शासनाने दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करून प्रत्येक बॅच मध्ये फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करून क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. तरी आपण आमच्या या निवेदनाचा विचार करावा व यावेळी शासनाने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा असे प्रोफेशनल टीचर असोसिएशन बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर सर यांनी मागणी केली. यावेळी अशोक बापू देशमुख, विनोद पऱ्हाड, प्रशांत देशमुख, सतीश रायबोले आदी उपस्थित होते.

Related posts

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अभूतपूर्व ठरण्याची चिन्हे! जिजाऊ श्रुष्टी नटली; जन्मस्थान सजले !!

nirbhid swarajya

शॉर्ट सर्किटमुळे दोन वाहने जळून खाक

nirbhid swarajya

जिल्ह्यात शनिवार व रविवारला संचारबंदी

nirbhid swarajya
error: Content is protected !!