खामगांव : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ९.०५ वाजता खामगाव ची उपविभागीय अधिकारी महसूल मुकेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.05 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे आयोजित करण्यात आला असल्याने सदर दिवशी सकाळी 8:35 ते 09:35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8:35 यापूर्वी 09:35 च्या नंतर आयोजित करावा. कार्यालय अथवा संस्थेने करून संसर्ग सुरक्षिततेची सर्व नियम पाळून ध्वजारोहण कार्यक्रम करावा. दिवसभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण देशभक्तीपर गीत स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन आपापल्या स्तरावर करण्यात यावे, स्वातंत्र्य दिनाचा साजेसा समारंभ करावा. सदर कार्यक्रमात कोरोना संसर्ग सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात येणार आहे. सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे प्रामुख्याने कार्यक्रमाचे वेळी पालन सर्वांनी करावे असे आवाहन खामगाव प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण यांनी केले आहे.