खामगाव : येथील वकील संघाचे अध्यक्ष अँड. शेखर पाटील यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की,उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी राजस्व प्रकरणात दिलेल्या निर्णयावरून विरुद्ध अपील हे अपर जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे समक्ष चालते गेल्या अनेक वर्षांपासून खामगाव, शेगाव तालुक्यातील अशा प्रकरणाकरीता अपर जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्हा हे खामगाव येथील कार्यालयात येऊन घेत होते. सदर व्यवस्थाही खामगाव शेगाव तालुक्यातील अशील, वकिलांच्या सुविधेसाठी निश्चित करण्यात आली होती.परंतु गेल्या सहा-सात महिन्यांपासून खामगाव येथे होणारे कॅम्प बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व पक्षकार वकिलांना अपिलाच्या प्रकरणा करिता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे हजर राहावे लागते.त्यामुळे अनेकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड व शारीरिक त्रास आणि कोरणा संसर्गाचा धोका सहन करावा लागत आहे. त्यामुळे खामगाव मध्ये कॅम्प परत सुरू करण्यात यावा अशी मागणी वकील संघाचे अध्यक्ष अँड. शेखर पाटील यांनी केली आहे.सदर निवेदनाची प्रत महसूल आयुक्त अमरावती विभाग यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.