April 11, 2025
अकोला खामगाव जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा राजकीय संग्रामपूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाबुलडाणा जिल्हा दौरा

बुलडाणा-दि.20 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार, दिनांक 21 मे 2022 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 21 मे रोजी सकाळी 9.15 वाजता औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने सिंदखेडराजाकडे प्रयाण, सकाळी 9.40 वाजता जिजाऊ सृष्टी, सिंदखेडराजा हेलिपॅड येथे आगमन, सकाळी 10 वाजता माँ जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन, त्यानंतर सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी,

दु. 2 वाजता पंचायत समिती सभागृहात सिंदखेडराजा विकास आराखडा व जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती, दु. 4.15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, सिंदखेडराजा येथे आगमन व राखीव, दु. 4.40 वाजता देऊळगांवराजा रोड येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज येथे माँ जिजाऊ व शिवबा यांचे नियोजीत पुतळा उभारणी स्थळाची पाहणी करतील.सायं 5 वाजता जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा हेलिपॅड येथे आगमन व जळगांव जामोदकडे प्रयाण,सायं 5.40 वाजता कुटे मैदान हेलिपॅड, जळगांव जामोद येथे आगमन, सायं 5.45 वा शासकीय विश्रामगृह येथे राखीव, सायं 7 वाजता एसकेके कॉलेज प्रांगण येथे आगमन व जाहीर सभेस उपस्थिती, रात्रौ 9.30 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, अकोलाकडे प्रयाण करतील असे जिल्हा माहीती अधिकारी यांनी कळविले आहे

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 142 कोरोना अहवाल निगेटीव्ह; 17 पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

Barely Into Beta, Sansar Is Already Making Social VR Look Good

admin

एसटी वाहक तरुणीची गळा चिरून हत्‍या

nirbhid swarajya
error: Content is protected !!