बुलढाणा : संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन येत्या ३० नोव्हेंबरला नाशिक येथे आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने व संभाजी ब्रिगेड तर्फे महाराष्ट्रात सुरु असलेल्या सदस्य नोंदणी चा आढावा विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात जळगाव जामोद, नांदुरा व मोताळा तालुक्याचा जनसंवाद दौरा पार पडणार आहे. तरी सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील बैठकीला उपस्थित राहावे.सोबत संभाजी ब्रिगेड जिल्हा पदाधिकारी यांनी संपूर्ण जनसंवाद दौऱ्यात सोबत उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले असून.दिनांक. २७/११/२०२२ रविवारला जळगाव जामोद येथे सकाळी १०/:३० ला,नांदुरा येथे दुपारी २ वाजता तर मोताळा येथे दुपारी ४:३० ला बैठक आयोजित केली असून महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे.तरी या बैठकीला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
