जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले आदेश
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय अखेर जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे, सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत ही दुकाने उघडी राहणार आहे.
लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी सरकार ने दिली होती, त्यानुसार बुलडाणा जिल्हा हा ऑरेंज झोन मध्ये आहे मात्र जिल्हाधिकारी सुमन चंद्र यांनी जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक बाबींची दुकाने वगळता कुठलीही दुकाने उघडणार नाहीत असा आदेश काढल्याने मद्य प्रेमींची मोठ्या प्रमाणात निराशा झाली होती मात्र अर्थव्यवस्थेचा विचार करता आज जिल्हाधिकारी यांनी उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले असून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत समाजिक आणि शारीरिक अंतर ठेवून दुकाने उघडी राहणार आहेत.