प्रत्येक सूज्ञ नागरिक कर्तव्य भावनेतून समाजात वावरतांना आपले एक ध्येय निश्चित करून यशोशिखर गाठत असतो. मात्र यासाठी सामाजिक जाणीव ठेवून समाजाप्रति आपले काही देणे लागते, ही भावना उराशी बाळगून अशा व्यक्ती आपल्या कर्तृत्व भावनेतून समाजात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करून अमीट ठसा उमटवितात.यामुळेच स्वतः च्या कार्य कर्तृत्वाच्या भरवशावर ज्याही क्षेत्रात जातील तेथे यश प्राप्त करून सामाजिक व राजकीय जीवनात यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न करीत असतात, यासाठी त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांच्या कामी येते अशाप्रकारे समाजसेवेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करून मजल दरमजल यश प्राप्त करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक गणेशभाऊ ताठे यांचा आज (२२ में) वाढदिवस.सर्वप्रथम त्यांना निर्भिड स्वराज्य टीम कडून वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन ! गणेशभाऊ ताठे यांनी तालुक्यातील माक्ता-कोक्ता येथील सरपंच म्हणून राजकीय जीवनाला सुरुवात केली. एवढेच नव्हे,तर आपल्या कार्यशैलीच्या बळावर त्यांनी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष पद सुद्धा भूषविले. सुमारे १० वर्षाच्या राजकिय कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या अडी -अडचणी सोडविल्या, वेळी-अवेळी अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली हे सर्व करीत असतानाच संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी कार्यकर्ता युवकांची फळी निर्माण करून एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून गणेश भाऊ ताठे यांनी खामगाव तालुक्यात नावलौकिक प्राप्त केले आहे.

सुरुवातीच्या काळात भाजपच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करणारे गणेश भाऊ ताठे यांनी विकासाभिमुख दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत अखिल भारतीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, नव्हे तर त्यांचा विश्वासही संपादन केला त्याचीच फलश्रुती म्हणजे आज गणेश भाऊ ताठे विदर्भातील सर्वात मोठी असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी विराजमान झाले आहेत. गणेश भाऊ ताठे यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात काँक्रीट रस्ते,घरकुल योजना,तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचविल्या वेळेप्रसंगी गरजूंना आर्थिक मदतही केली.संकटसमयी मदतीला धावून येणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांची आज यशस्वी राजकीय सामाजिक वाटचाल सुरू आहे.त्यांची वाटचाल अशीच सुरू राहो व त्यांच्या हातून सर्वसामान्य जनतेची सेवा घडो यासाठी आई भवानी त्यांना दीर्घायुष्य देवो हीच शुभकामना
(निर्भिड स्वराज्य टिम)