खामगाव : उत्तर प्रदेश मधील हाथसर जिल्ह्यातील चंदपा हद्दीत दलित अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे याकरिता आज उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे निवेदन दिले आहे.सदर दिलेल्या निवेदनामध्ये नमुद आहे की, उत्तर प्रदेश मधील हाथसर जिल्ह्यातील चंदपा पोलीस हद्दीत 14 सप्टेंबर 2020 रोजी 19 वर्षीय अल्पवयीन दलित मुलगी शेतात काम करत असताना चार नराधमाने तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला अमानुषपणे मारहाण करून तिची जिभ दाताने तोडण्यात आली.
तसेच पाठीचा कणा मोडला असून मानेच्या मणक्यावर गंभीर इजा केली आहे. पीडित मुलगी ही कलिंगड येथील हॉस्पिटलमध्ये मधे जीवन मरण्याची झुंज देत होती, परंतु 29 सप्टेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटना ही मानवतेला काळिमा फासणारी घटना असून उत्तर प्रदेश मधील योगी सरकारच्या कार्यकाळात अत्याचार व हत्याकांड वाढले आहेत.या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे तसेच या प्रकरणातील निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी केले पाहिजे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. याकरिता ऑल इंडिया पँथर सेना कडून आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.