खामगांव : काल २३ मे रोजी इलेक्ट्रिशन व प्लंबर संघटना प्रमुख सुधिर काळे यांच्या मार्गदर्शनात इलेक्ट्रिशन व प्लंबर संघटना तयार करण्यात आली.यावेळी सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्यात येऊन सदर बैठकीत अध्यक्ष पदी कैलास जुंनगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी संजय वाघ, सचिव पदी राजु बोचरे, प्रसिद्धी प्रमुख पदी सागर वनारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी प्रमुख सल्लागार गजानन बोर्डे, ज्ञानदेव चोपडे,राहुल गवई, वैभव अंबुसकर यांची निवड करण्यात आली. तर सदस्य पदी संतोष बाप्पु देशमुख, रघु नारखेडे, सुनिल नारखेडे, नितिन टाले, पृथ्वी सियाराम, गणेश आकोटकर, सुरज सोनार, सुरज ढोले, संजय गवई, सिध्देश्वर ढोले, उमेश ताठे, मोहन तायडे, कुंदन तायडे, अरूण खंडारे, मंगेश ऐकडे, अरुण खंडारे, उमेश हुसे, रामकृष्ण क्षीरसागर, पुरुषोत्तम करांगळे, अमित देशमुख, गौरव पवार, सुनील हेलोडे,यांची निवड करण्यात आली. यावेळी इलेक्ट्रिशन व प्लंबर संघटनेचे आदि सदस्यांची उपस्थिती होती.