खामगांव : येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर खेल का मैदान व पूर्णा निधी बँक येथे इलेक्ट्रिशन प्लंबर असोसिएशन खामगांव व पूर्णा निधी बँकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगासह राज्यातही कोरोनाने थैमान घातलेले असून कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती. त्याचा विचार करुन संपूर्ण मानव जातीने नैसर्गिक संपत्ती जोपासणे गरजेचे आहे. याकरीता वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. त्यामुळे येणा-या पिढीसाठी आपण निश्चितच योगदान देऊ शकतो. या भावनेने सदर उपक्रम इलेक्ट्रिशन प्लंबर असोसिएशन खामगांव व पूर्णा निधी बँक यांच्या तर्फे राबावण्यात आला. तसेच यातील सर्वानी वृक्षारोपण करुन वृक्ष जगवण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय गवई, पूर्णा निधी बँक अध्यक्ष मोहन कुलकर्णी, उपाध्यक्ष जुगल किशोर मुखिया, तसेच इलेक्ट्रिशन & प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष कैलास जुंनगडे,उपाध्यक्ष संजय वाघ, सचिव राजु बोचरे,प्रसिद्धी प्रमुख सागर वनारे,सदस्य अतुल रायणे, राहुल गवई, वैभव अंबुस्कर, संतोषबाप्पू देशमुख, अतुल घेंगे, मंगेश देशमुख गजानन बोर्डे, ज्ञानदेव चोपडे, सुरज सोनार,सुधीर काळे यांच्यासह कर्मचारीवृंद, पदाधिकारी यांची उपस्थिती होती
previous post