खामगाव : येथील तायडे कॉलनी भागातील शेगाव येथे भुमिअभिलेख विभागामध्ये कार्यरत असलेले राजाराम बोंदीराम राठोड यांच्या घरी आज सकाळी 11 वाजता शेगाव येथील इम्रान खान मुन्ना खान 25 व नाजिम खान 49 हे दोघे वेल्डिंग चे काम करत होते. काम करत असताना इम्रान खान याला फोन आला व तो मोबाइल वर बोलत असताना त्यांच्या हातातील कटर मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाह आल्याने त्यांना शॉक लागला.

त्यांच्या सोबत असलेले नाजिम खान हे त्यांना वाचविण्यास गेले असता त्यांना सुद्धा शॉक लागला व ते बाजुला फेकले गेले. ही घटना लक्षात येताच राजाराम राठोड व परिसरातील नागरिकांनी दोघांना सामान्य रुग्णालयात आणले.इम्रान खान यांची डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले तर नाजीम खान हा किरकोळ जखमी झाला त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी राजाराम बोंदीराम राठोड शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून कलम 174 नुसार मर्ग दाखल करण्यात आला आहे.