मुलांचा 95.18, तर मुलींचा 97.24 टक्के निकाल
172 शाळांनी गाठली निकालाची शंभरी
बुलडाणा : इयत्ता 10 वी चा निकाल आज जाहीर करण्यात आला. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निकाल कधी लागणार असा प्रश्न असताना मंडळाने आज लावलेला निकाल महत्वपूर्ण आहे. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. जिल्ह्यात इयत्ता 12 वी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली असून सर्व निकालात मुलींचाच बोलबाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 96.10 टक्के लागला आहे. निकालामध्ये जिल्हा अमरावती विभागातून प्रथम आहे.
जिल्ह्यात इयत्ता 10 वीची परीक्षा मार्च 2020 मध्ये पार पडली. या परीक्षेस जिल्ह्यातून एकूण 43 हजार 922 विद्यार्थी प्रवेशित झाले होते. त्यापैकी 43 हजार 669 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 41 हजार 419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 78 मुले, तर 17 हजार 951 मुली आहेत. त्यापैकी 21 हजार 04 मुले आणि 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. एकूण 38 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 95.18 असून मुलींची टक्केवारी 97.24 आहे.
इयत्ता 10 वीच्या परीक्षेकरीता जिल्ह्यात नियमित विद्यार्थी 40 हजार 250 प्रवेशित झाले होते. त्यापैकी 40 हजार 29 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 14 मुले व 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्यांद मध्ये 16 हजार 87 विद्यार्थी डिस्टीक्शन, 13 हजार 731 विद्यार्थी ग्रेड 1, 7 हजार 109 विद्यार्थी ग्रेड 2 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात दहावीच्या निकालात तब्बल 172 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामध्ये एस.डी पाटील माध्यमिक विद्यालय, डिडोळा बु व सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे विद्यालय गिरोली यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 3640 विद्यार्थ्यांनी पुर्नपरीक्षा दिली. त्यापैकी 3030 पुर्नपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 83.24 आहे. पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेस नोंदणी केलेले मुले 2720 व मुली 952 आहेत. त्यापेकी 2696 मुलांनी, तर 944 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी 2176 मुले व 854 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेची मुलांची टक्केवारी 80.71 व मुलींची 90.47 टक्के आहे. जिल्ह्यात इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा प्रशासनाने अभिनंदन केले आहे.