माझी कन्या, पिठाची गिरणी व कृषी उपकरणे वाटप ग्रामीण भागात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कोरोना योध्दयांचा सत्कार
खामगाव : आमदार आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव पंचायत समिती येथे विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आ.ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते वस्तुंचे वाटप करण्यात आले. खामगांव पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम सभापती सौ रेखा युवराज मोरे, उपसभापती सौ शितल समाधान मुंडे, तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांच्यातर्फे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांचे हार, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर गट विकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, उपविभागीय अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा सिंचन बांधकाम), बाल विकास प्रकल्प अधिकारी,गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन विकास अधिकारी, यांचेकडून व अंतर्गत सर्व विभागीय अधिकारी कर्मचारी तसेच सरपंच, शिक्षक सह ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आमदार आकाश फुंडकर यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्यासाठी पंतप्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत ५० दिवसात घरकुल पूर्ण केलेले सन २०२०-२१ मधील दोन लाभार्थ्यांचे आ.आकाश फुंडकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. मतदार संघातील स्त्री पुरुष लिंग प्रमाणातील तफावत भरुन काढण्यासाठी मुलींना वाचविण्यासाठी व त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी “माझी कन्या भाग्यश्री” योजना अंतर्गत दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या सौ.जान्हवी गोपाल पांढरे रा.आसा व सौ.भक्ती शेषराव चव्हाण रा.पळशी बु. या दोन स्त्रीयांचे प्रत्येकी पंचवीस हजारांची मुदत ठेव पत्र देऊन स्वागत करण्यात आले. खामगाव तालुक्यातील covid-19 अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक यांचे प्रातिनिधीक स्वरुपात आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या हस्ते सत्कार व स्वागत करुन अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना समाज कल्याण योजना महिला व बालकल्याण कृषी विभाग यांच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थी पिठाची गिरणी, महिला शिलाई, मशीन शेतकरी पावर स्प्रे पंप, ताडपत्री इत्यादी साहित्यांचे वाटप आमदार आकाश फुंडकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती रेखा युवराज मोरे, उपसभापती सौ शितल समाधान मुंडे सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, तसेच तालुक्यातील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शदरचंद्र गायकी, तालुका भाजपा अध्यक्ष सुरेशभाऊ गव्हाड, गोपाल गव्हाळे,लालाभाऊ महाले, विनोद टिकार, ज्ञानदेवराव मानकर, युवराज मोरे, समाधान मुंडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्यानंतर सत्कारमूर्ती ॲड. आकाश फुंडकर यांनी पंचायत समितीस पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्रस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सभापती उपसभापती जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचे कौतुक केले तसेच विविध योजना अंतर्गत ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना लाभ दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस विजय महाले यांनी पाहिले.