आ.गायकवाडांना अटक होईपर्यंत बुलडाणा न सोडण्याचा कुटेंचा निर्धार!
बुलडाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या वरिष्ठांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्यानंतर जिल्ह्यात आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला होता. काल माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता या वेळी शिवसैनिक व भाजपचे पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी सुद्धा झाली होती. यानंतर या घटनेचा निषेध नोंदवणे करिता भाजपचे माजी मंत्री तथा आ.डॉ.संजय कुटे यांनी आमदार संजय गायकवाड यांना यांच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर दिले होते.त्यांच्यात प्रतिउत्तर आला उत्तर देत आमदार गायकवाड यांनी आमदार कुट्टी यांना खालच्या स्तराची भाषा वापरून ५० फूट जवळ येण्याचे चॅलेंज दिले होते.तेच चॅलेंज स्वीकारतात आ. डॉ. संजय कुटे आज बुलढाण्यात दाखल झाले होते. त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते बुलढाण्याच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र डॉक्टर संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांना वापस जावे असे आवाहन केल्यानंतर काही कार्यकर्ते पुन्हा आपल्या मतदारसंघाच्या दिशेने परतली सुद्धा होते. त्यानंतर आज दुपारी भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार चैनसुख संचेती जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, तसेच बुलढाणा चे माजी आमदार विजयराज शिंदे सोबत जिल्हाभरातून 400 ते 500 कार्यकर्ते यांचा हा सर्व जमाव आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. तिथे आमदार कुटेंनी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची भेट घेत गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर कुटे आणि सोबतची प्रमुख नेतेमंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. तिथून भाजपा कार्यालयात येत कुटेंनी पत्रकार परिषद घेतली. राजकारणाची ही वेळ नाही असे म्हणत आमच्यासाठी हा विषय संपल्याचे जाहीर केले. मात्र या सर्व घडामोडीनंतर आमदार कुटे हे आपल्या वाहनाच्या ताफ्या सोबत परतत असताना त्यांच्या गाड्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला व त्यांच्या गाड्यांची काच फोडण्यात आले. एकीकडे वाद मिटल्याने जिल्हावासिय सुटकेचा निःश्वास टाकत असतानाच जळगाव जामोदकडे परतणाऱ्या आमदार कुटेंच्या गाडीवर जयस्तंभ चौकातील गायकवाडांच्या कार्यालयाजवळ पन्नासेक तरुणांनी दगडफेक केली. त्यामुळे वातावरण पुन्हा पेटले असून, जोपर्यंत गायकवाड आणि दगडफेक करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बुलडाणा सोडणार नाही, असा इशारा आ.कुटे यांनी दिला आहे. दिवसाढवळ्या दगडफेक झाल्याने एकूण कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे, असे आ.कुटे म्हणाले. हा प्रकार प्रकार घडत असताना परत गेलेल्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, योगेंद्र गोडे, शिंदे, विनोद वाघ मलकापूर रोडवर दाखल झाले. सर्वांनी रस्ता अडवल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. य्या सर्व घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हेही दाखल झाले. त्यांनी कुटे आणि भाजपा नेत्यांची समजूत काढत कारवाईसाठी वेळ देण्याची विनंती केली. अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, दंगा काबू पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांना न येण्याचे आवाहन करूनही ते एवढ्या मोठ्या संख्येने आल्याचे आ. डॉ.संजय कुटे यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर सांगितले. कोरोनाच्या स्थितीमुळे कार्यकर्त्यांना परत जाण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तरीही बरेच कार्यकर्ते आ.कुटे परत जाईपर्यंत ठाम मांडून होते. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाताना कुटे यांच्यासोबत आमदार सौ. महाले पाटील, माजी आमदार संचेती यांच्यासह विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, विनोद वाघ सोबत होते. पोलीस अधीक्षकांना भेटून आल्यावर आमदार संजय कुटे म्हणाले, की आमदार गायकवाड यांनी केलेली अश्लील शिविगाळ, विरोधी पक्षनेते, पंतप्रधान यांच्यावर खालच्या भाषेत केलेली टीका आणि कालपासून एकूणच घडलेल्या घडामोडींवर जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून त्यांच्याकडे पक्षाचा अभिनिवेश न बाळगता गायकवाडांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याने आता नेमके कुठले वळण घेते हे पाहावे लागणार आहे…..!