भाजपा विद्यार्थी आघाडी व युवा मोर्चाच्या कोरोना फायटर पोलीसांचे सत्कार
खामगाव : “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणेने शिवाजी वेस परिसर दुमदुमला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी झाला होता. त्यानिमीत्य़ आज खामगांव शहरातील शिवाजी वेस भागात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.भाजपा विद्यार्थी आघाडी व युवा मोर्चाच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळया निमित्त कोरोना काळात कोरोना फायटर म्हणून काम करणाऱ्या पोलीसांचे यावेळी स्वागत व सत्कार करण्यात आला.
यामध्ये एएसआय मनोज खुंटे, एस सी. सुनील बोरले, एस.सी. गजानन चोपड़े, एनपीसी बाळु फुंडकर, पी सी भगवान साखरे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात कोरोना नियमांचे पालन करीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम भाऊ मिश्रा, माजी नगरसेवक विजय उगले, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, हर्ष मोहता, मयूर टाले, जय गायकवाड, राजू मिरर्गे, चिंटू निचळे,हिमांशू खत्री,वैभव चोखट,गौरव पवार, श्याम गायकवाड, कपिल पुरोहित, अनिकेत देशमुख, आनंद टिकार,सागर टिकार,गोपाल शेळके,ललित दायमा,वैभव सोनोने, मंथनराजे हिवरखेडे,मयूर कोथळकर,अभिषेक थोरात,आशिषसिह बघेल,शुभम अहिर,यश पाचपोर,ओम देशमुख, दीपक देशमुख, अक्षय उमाळे, शुभम धोपटे, सोनू वालेकडे, स्वप्निल मालवेकर, रुपेश शेंबेकर, सचिन भाकरे,पंकज व्यास, आप्पा शेंबेकर, रोशन गायकवाड यांची उपस्थिती होती.