खामगांव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या पुजन व पुष्पहार अर्पण करुन छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा, छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त खामगांव येथील छत्रपति शिवाजी महाराज स्टेडीयम येथे खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी महाराजांच्या पुतळयास माल्यार्पण करुन अभिवादन केले. खामगांव विधानसभा मतदार संघात शिवाजी महाराज जयंती निमीत्य़ ठिकठिकाणी छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळयांचे पुजन व अभिवादन करण्याचे आयोजन करण्यात आले.आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती अश्वरुढ पुतळयास माल्यार्पण करुन अभिवादन केले.यावेळी छत्रपति शिवाजी महाराजांच्या जय घोषाने परीसर दुमदुमला. यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळयास देखील माल्यार्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी जेष्ठ नेते ओंकारआप्पा तोडकर,प्रविण कदम, राम मिश्रा, गणेश सोनोने, बाहेकर,आंबेकर, सुरेश घाडगे,संजय घोगरे, प्रसाद तोडकर, पवन गरड यांचेसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
previous post