खामगाव:राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे विशेष प्रेम असलेल्या घाटपुरी गावात त्यांच्या नावे वाचनालय व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असल्याने नुकतेच येथे पांडुरंग वाचनालयाचे उद्घाटन आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.येथील श्रीधर नगर भागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगिताताई ढोले होत्या. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पांडुरंग वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते फित कापण्यात आले.तद्नंदर स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी पं.स. सदस्य मुन्ना दळवी,भाजयुमोचे जिल्हा चिटणीस विजय महाले, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील वानखडे, गोपाल ढोले, बाळकृष्ण चतारे, ग्रा.पं. सदस्य गोपाल महारखेडे, विशाल झनके, विष्णु कुळसुंदर, कृष्णा वनारे, निखील तायडे, नामदेव महाले, भगवान दुतोंडे, मंगेश टोपरे, दिपक सांगळे, लालसिंग राठोड, ज्ञानेश्वर राऊत, सागर वनारे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष अनिल खोडके, उपाध्यक्ष गोपाल क्षिरसागर, कोषाध्यक्ष नारायण ढोले, सहसचिव ज्ञानेश्वर मिरगे, सदस्य संतोष ढगे, कृष्णा वडोदे, प्रदीप अनिल खोडके यांनी परिश्रम घेतले.
सोशल मीडियाच्या काळातही पुस्तक वाचन महत्वाचे – आ.अॅड.आकाश फुंडकर
आपली संस्कृती ही वाचन संस्कृती आहे वाचनाने ज्ञानत भर पडते. सध्या तरुण मुले-मुली मोबाईलमध्ये गुरफटलेले दिसतात. सोशल मीडिया असून या काळातही पुस्तकी वाचन महत्वाचे आहे. ‘वाचाल तर वाचाल’ याप्रमाणे वाचन करणे आपण केलेच पाहिजे. ग्रामिण भागात यासाठी असलेल्या वाचनालयाचा युवकांनी उपयोग घ्यावा, असे आवाहन यावेळी आ.अॅड.आकाश फुंडकर यांनी